Tuesday, November 11, 2025

Buy now

spot_img

‘ह्या’ सुवर्णमय वाटचालीच्या उद्घाटनाचा मला मान, याचा मला सार्थ अभिमान! ; महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा नेते विशाल परब यांचे प्रतिपादन.

सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय सुवर्ण महोत्सवी बक्षीस वितरण समारंभाचा दिमाखदार शुभारंभ आज सातार्डा महापुरुष मंदिर सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला.

यावेळी विशाल परब यांनी संबोधित केले. ते म्हणाले, सातार्डा परिसरातील नागरिकांनी जपलेल्या वाचन संस्कृतीचे कौतुक केले. आजच्या डिजिटल युगात टिळक ग्रंथालयाच्या माध्यमातून होत असलेला वाचन संस्कृतीचा सुवर्ण महोत्सव हा खरोखरच गौरवास्पद आहे. याचे कौतुक करण्याचा मान मला या कार्यक्रमाच्या उद्घाटनातून मिळाला हे माझे खरोखरच भाग्य असून याचा मला मनापासून अभिमान आहे, असेही विशाल परब यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक दत्ता कवठणकर, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके, माजी अध्यक्ष  अनंत वैद्य, माजी सभापती शर्वाणी गावकर, माजी पंचायत समिती सदस्य श्रुतिका बागकर, उबाठा सेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख – रुपेश राऊळ, सरपंच संदिप रावनी प्रभू, कवठणी सरपंच अजित कवठणकर, सातोसे सरपंच प्रतिक्षा मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles