दोडामार्ग : व्हॉईस ऑफ मीडिया व इतर डिजिटल मीडिया पत्रकार हे व्यावसायिक पत्रकार असून, स्थानिक व राष्ट्रीय माध्यमांत निष्ठेने वार्तांकनाचे कार्य करत आहे. दिनांक १० नोव्हेंबर रोजी एका सामाजिक माध्यमावर संदेश वरक मित्र मंडळ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पत्रकाराविरुद्ध एका इसमाने बदनामीकारक मजकूर प्रसारित केला आहे. तसेच त्या मजकुरात पत्रकारांच्या खोटी, अपमानास्पद व प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी पोस्ट / विधाने प्रसिद्ध केली आहेत. त्या मजकुरामुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेआहे. ही कृती भारतीय दंड संहिता कलम 499, 500 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 अंतर्गत गुन्हा ठरतो. त्यामुळे त्या इसमावर कारवाई करावी अशी मागणी व्हाईस ऑफ मीडिया व इतर डिजिटल मीडिया पत्रकारांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष भूषण सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रथमेश गवस, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बुधाजी उर्फ आपा राणे, सचिव प्रतिक राणे, पत्रकार प्रमोद गवस, गोविंद शिरसाट आदि उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी सदर इसमावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
पत्रकारांची विनाकारण बदनामी करणाऱ्याविरुद्ध योग्य ती कारवाई करा! ; दोडामार्ग पोलिसांकडे पत्रकारांची निवेदनाद्वारे मागणी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


