सावंतवाडी : महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानामध्ये मिलाग्रिस हायस्कूल ने तालुकास्तरावर प्रथम तर जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळवत उज्वल यश संपादन केले. प्रशालेचे प्राचार्य फादर रिचर्ड सालदाना यांच्या कुशल नेतृत्वाखाली मिलाग्रीस प्रशालेचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूल जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळवत रोख रक्कम तीन लाखाचे मानकरी ठरले. या उत्तुंग यशाबद्दल प्रशालेचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – 2 मध्ये मिळविलेले यश हे या सर्वांचे फलित असल्याची भावना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांनी यावेळी व्यक्त केली. संस्थाध्यक्ष बिशप ऑल्विन बरॅटो तसेच अन्य संस्थाचालक यांनी या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांचे आभार व्यक्त करीत अभिनंदन केले. यावेळी वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना बोडके तसेच केंद्रप्रमुख श्री प्रमोद पावसकर व श्री कमलाकर ठाकूर यांचे मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी आभार व्यक्त केले .
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – २ स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलची उत्तुंग भरारी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


