सावंतवाडी : सावंवाडीतील चिटणीस वाडा येथे नुकतीच मुकुंद चिटणीस काका यांची भेट झाली. अर्थात मी त्यांना मिलिटरी बॉइज हॉस्टेलमध्ये असल्यापासून अगदी माझ्या लहानपणापासून पाहत आलो आहे. आज देखील शरीरयष्टीत फारसा फरक झालेला दिसून आला नाही. खरंतर त्यांचे पूर्ण नाव श्री निळकंठ वामन चिटणीस..
सावंतवाडी संस्थान खालसा झाले त्यावेळी शेवटचे चिटणीस म्हणून त्यांनी कारभार पाहिला होता. आणि त्यानंतर लोकशाहीचा अर्थातच गणराज्यचा उगम झाला…
तसं मी त्यांना मिलिटरी बॉईज हॉस्टेलमध्ये असल्यापासून पाहत आलो आहे. त्या आमच्या लहान वयात त्यांना पाहिलं होतं तशीच त्यांची आजही शरीरयष्टी आहे. दोन दिवसापूर्वी त्यांचं येणं सावंतवाडीत झाले आणि म्हणून मुद्दाम त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी व १०३ वर्षाचं निरोगी आयुष्य काढल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझी पावले तिकडे वळली. यावेळी माझ्यासोबत आमचे सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीमान कविटकर साहेब हे देखील उपस्थित होते. अर्थात कुटुंबीयांनी माहिती दिल्याप्रमाणे त्यांनी आजही कोणतीही गोळी घेतली नाही,. हे खास वैशिष्ट्य… तब्बल १०३ वर्षाच्या काकाचे आशीर्वाद घेण्याचा योग जुळून आला. याचा खरोखर मनस्वी आनंद झाला जो शब्दात मांडणे कठीण आहे.
चिटणीस काकांचा निरोप घेऊन घरी परतत असताना आपसूकच श्रीदेवी पाटेकर यांना विनंती केली “हे देवा, असंचं निरोगी आयुष्य सर्वांना मिळू दे… जो जे मागील त्याला नक्की मिळू दे..!”
खरंतर चिटणीस काकांसारखी माणसं ही अनुभव आणि ज्ञानाचा खजिना आहेत त्यांच्याजवळ थोडा वेळ बसणे ही फार मोठी मिळत आहे आज माझ्यासारख्या नेहमी शिकण्याची आवड असणारे व्यक्तीला हा सुवर्णयोग मिळाला त्यासाठी देवाचे हृदयापासून धन्यवाद आणि आमचे आरोग्याचे खरे दीपस्तंभ चिटणीस काकांना खूप खूप प्रणाम!
✍️सुनील राऊळ.
सावंतवाडी – सिंधुदुर्ग.


