सावंतवाडी : माझ्या यशात माजे सासरे, सासू तसेच माझ्या प्रभागातील तमाम जनता आणि माझ्यावर विश्वास टाकून मला शिवसेनेतून उमेदवारी देणारे सन्माननीय आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह तमाम सावंतवाडीवासीयांचे मी ऋण व्यक्त करत असून जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थकी लावेल, अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक चारमधील शिवसेनेच्या विजयी उमेदवार ॲड. सायली काशिनाथ दुभाषी यांनी दिली आहे.
ॲड. सायली दुभाषी यांनी 484 मते मिळून या प्रभागातून विजयश्री खेचून आणली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी समीर अमिन खलील- शिवसेना (उबाठा) – 466, शेख मेहशर इम्रान (भाजप – 342), शेख निशातअंजुम मोहम्मदहनीफ (काँग्रेस – 86), व नोटा – 24 यांना अशी मते मिळाली.
दरम्यान आगामी काळात प्रभागातील सगळ्यात महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचेही ॲड. सायली काशिनाथ दुभाषी यांनी स्पष्ट केले.


