नवी दिल्ली : 7 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता. नियमानुसार 10 वर्षांत नवा वेतन आयोग येतो. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 रोजी 7 व्या वेतन आयोगाचा कार्यकाल समाप्त होत आहे. सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये 8 व्या वेतन आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजूरी दिली होती. यानंतर नोव्हेंबरमध्ये अधिसूचना जारी झाली. यामुळे हे स्पष्ट झाले की नवा वेतन आयोगाची प्रक्रीया सुरु झाली आहे.
8 व्या वेतन आयोगाला त्याचा अहवाल तयार करण्यासाठी 18 महिन्याचा वेळ दिला आहे. या दरम्यान आयोग महागाईचा दर आर्थिक स्थिती आणि कर्मचाऱ्यांची गरज याचे अध्ययन करणार आहे. गेल्या वेतन आयोगाचा ट्रेंड पाहिला तर नवीन सॅलरी स्ट्रक्चर जुना वेतन आयोग संपताच प्रभावी होतो. त्यामुळे 1 जानेवारी 2026 ही संभाव्य तारीख असू शकतो.
तज्ज्ञांच्या मते यंदा वेतनात 20-35 टक्के वाढ होऊ शकते. मात्र सरकारकडून कोणताही अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही.

7 व्या वेतना आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. बातमीनुसार यास वाढवून 3 वा त्याहून अधिक केले जाऊ शकते. त्यामुळे किमान वेतनात मोठी वाढ होऊ शकते. 8 वा वेतन आयोग केवळ कर्मचाऱ्यांपर्यंत मर्यादित नाही. तर पेन्शनधारकांच्या पेन्शन आणि डीए याती देखील वाढ होणार आहे.ज्यामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचे जीवनमान चांगले होण्याची आशा आहे. वेतन आयोगाची तारीख योग्यवेळी जाहीर केली जाणार आहे असे सरकार म्हणते. सध्या कर्मचारी संघटना आणि लाखो कर्मचारी घोषणेची वाट पहात आहे.
https://youtube.com/shorts/i3ReKXF_wqo?feature=share


