✍️ – भूषण आरोसकर.
सावंतवाडी : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) वतीने आयोजित करण्यात आलेल्या केरळ ट्रेकसाठी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूलचा एनसीसी कॅडेट कार्पोरल प्रज्वल कविता विकास पाटोळे याची निवड झाली आहे.
प्रज्वल कविता विकास पाटोळे हा केरळमधील कोलम, तिरुवनंतपुरम येथे दाखल झाला असून पुढील दहा दिवस हा ट्रेक चालणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी व प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्सना साहसी प्रशिक्षण, शिस्त, नेतृत्वगुण, संघभावना तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांचे मार्गदर्शन लाभले. 58 एनसीसी महाराष्ट्र बटालियन चे प्रमुख कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज यल यांचे मोलाचे सहकार्य लाभले यांनीही पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ADVT–

या निवडीमुळे कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी तसेच परिसरात आनंदाचे वातावरण आहे. प्रज्वलच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.शैलेश पई,सचिव श्री प्रसाद नार्वेकर,संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.व्ही.भुरे, पर्यवेक्षक श्री एस.एस.वराडकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


