Thursday, December 25, 2025

Buy now

spot_img

‘राष्ट्ररत्न अटलजी’! – भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीनीमित्त ॲड. नकुल पार्सेकर यांचा विशेष लेख.

आज २५ डिसेंबर या दिवशी विश्वातील दोन अतिशय महत्त्वपूर्ण घटना घडल्या. शांतीचा संदेश अवघ्या विश्वाला देणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्म आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सुसंस्कृत राजकारण करण्याचा आदर्श घालून देणाऱ्या राष्ट्ररत्न अटलजींचा जन्मदिवस.आज त्यांची शंभरावी जयंती.अर्थात माझ्या सगळ्यात आवडत्या आणि आदर्श नेत्याचा वाढदिवस.

 
अटलजींचे दुसरे नावं म्हणजे माणुसकी,अटलजी म्हणजे राष्ट्रभक्तीचा आणि प्रखर राष्ट्रवादाचा धगधगता निखारा ,अटलजी म्हणजे कणखरपणा,अटलजी म्हणजे द्रुढ निश्चय,अटलजी म्हणजे सळसळता स्वच्छ प्रवाह,अटलजी म्हणजे सदसद्विवेक बुद्धी ,अटलजी म्हणजे संवेदनशीलता,अटलजी म्हणजे “मीपणाच्या” अहंकाराला तिलांजली देऊन देशात शांतता नांदावी,सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण व्हावे यासाठी सर्वसमावेशक राजकारण करणारा दुर्मिळ नेता. अटलजी म्हणजे त्याग आणि तपस्या.

अटलजी म्हणजे देशाला जागतिक स्तरावर मित्र जोडणारे देवदुत, चुकीचे समर्थन न करता राजधर्माची आठवण करून देणारे या भारत देशाचे सच्चे पालक ,अटलजींची अनेक रूपं आहेत.
आजची एकंदरीत सामाजिक व विशेषत: राजकीय परिस्थिती पहाता असे सुसंस्कृत राजकारणी पुन्हा होणे नाही.कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता आणि अमेरिके सारख्या महाशक्तीला भिक न घालता अणुस्फोट करून हम भी कुछ कम नहीं असा कणखरपणा दाखवणारे कणखर नेते.

विरोधी पक्षात असताना किडनीच्या आजाराने ञस्त होते.आजार बळावला होता अशावेळेस तत्कालीन पंतप्रधान स्व.राजीव गांधी त्याना आग्रहाने शासकीय व्यवस्थेत परदेशात उपचारासाठी पाठवून सहकार्य करणाऱ्यां राजीव गांधीचे भर संसदेत मोठ्या मनाने आभार मानणारे अटलजी म्हणतात ,” मै आज जिंदा हू,ये राजीवजीकी कृपा है”..विरोधी पक्षाबरोबर सुसंवाद ठेवणारे अटलजी हे एक दुर्मिळ रसायन होतं.
आजकाल मतदार आणि खासदार,आमदार घाऊक विकत घेतले जातात. अशावेळेस अटलजींवर जेव्हा अविश्वास ठराव आणला गेला तेव्हाचे सुमारे दिड तासाहून जास्त वेळ चाललेले त्यांचे ते अतिशय प्रभावी व ऐतिहासिक भाषण आजही पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं.

स्व. प्रमोद महाजनासारखे अत्यंत जवळचे आणि राजकीय व्यवस्थापनात माहिर असलेले एका मताचीचं का अगदी दहा बारा मतांची बेगमी सहज करू शकले असते.म्हणूनच आपल्या भाषणाचा शेवट करताना आदरणीय अटलजी म्हणाले,मी अशा सत्तेला चिमट्यानेही शिवणार नाही” असे बोलून तडक राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊन टाकला.
देशात कोणत्याही समस्येवर चर्चा करायची असेल तर पंडित जवाहरलाल नेहरूंचे नाव त्या समस्येशी जोडल्या शिवाय चर्चा पुर्ण होत नाही.पण नेहरू आणि अटलजींचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी त्यानी त्याचा परिणाम आपल्या वैयक्तिक संबंधांवर होवू दिला नाही.अटलजींची संसदेतील सर्व अभ्यासपूर्ण भाषणं नेहरू पूर्णवेळ संसदेत उपस्थित राहून मन लावून ऐकत. ते जेव्हा परराष्ट्रमंञी होते तेव्हा एका संकुचित विचार करणाऱ्यांने त्यांच्या दालनातील नेहरूंचा फोटो हटवला होता.ही बाब जेव्हा अटलजींच्या लक्षात आली तेव्हा तो होता तेथे लावण्याचा आदेश त्यानी दिला व फोटो लावला गेला.बोर्डवरची नांव मिटवता येतात..विचार कसे मिटवाल?
असा देशहिताचा व्यापक विचार करणाऱ्या अटलजींची प्रकर्षाने आठवण येते.त्यांचे नेतृत्व व कर्तृत्व एवढे उत्तुंग होते त्यामुळेच त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर जगातील निम्म्यापेक्षा जास्त देशानी आपले राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून मानवंदना दिली.
मी गेली वीस वर्षे माझ्या क्षमतेनुसार त्यांच्याच नांवाने स्थापन केलेल्या अटल प्रतिष्ठान या न्यासाच्या माध्यमातून छोटे मोठे समाजाभिमुख उपक्रम राबवतो ज्यामुळे अटलजींच्या स्मरणातून आत्मिक समाधान मिळते.अटलजी पुन्हा होणे नाही.

थोर भारतरत्नास माझे विनम्र अभिवादन.!

● ॲड. नकुल पार्सॅकर….●

  • संस्थापक अध्यक्ष – अटल प्रतिष्ठान, सावंतवाडी. 
  • ADVT – 
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                     https://youtube.com/shorts/yo8Hy_otS1s?feature=share

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles