Thursday, December 25, 2025

Buy now

spot_img

बलात्कारातील दोषी भाजपच्या माजी आमदाराची जन्मठेप स्थगित! ; पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण!, आदित्य ठाकरेंचा संताप.

मुंबई : उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी भाजपच्या माजी आमदारास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, उच्च न्यायालयाकडून आमदार कुलदीपसिंह सेगर यास जामीन मंजूर करण्यात आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली आहे. आरोपीने अगोदरच 7 वर्षे 5 महिने शिक्षा भोगल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यामुळे, देशभरातून संताप व्यक्त होत असून पीडित कुटुंबीयांनीही न्यायालयाच्या या निर्णयानंतर न्यायासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. मात्र, आंदोलनकर्त्या पीडित मुलीच्या आईसह मुलीला पोलिसांनी पकडून नेले. आता, या घटनेवर शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.

उन्नाव बलात्कारातील दोषी भाजप आमदाराला उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत पीडित कुटुंबीयांसाठी आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी, भाजपचे माजी आमदार कुलदीप यांची शिक्षा स्थगित केल्याने जगभरात संतापाची लाट उसळली आहे. याशिवाय, बलात्कारी व्यक्तीविरुद्ध निषेध करणाऱ्या पीडितेला आणि तिच्या आईला पोलिसांनी केलेली मारहाण धक्कादायक आहे. निवडणुकीच्या काळात भाजपने लाडकी बहीणसारख्या घोषणा दिल्या आणि योजना आखल्या. मात्र, आज पीडितेसोबत आणि आंदोलन करणाऱ्या तिच्या कुटुंबीयांसोबत काय घडतयं, असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला.

जगभरातील देश आणि लोक हे पाहतील, यावर बोलतील. परंतु भारतात आंदोलनकर्त्यांवरच हुकूमशाही पद्धतीने टीका होत असून मंत्री देखील या पीडितांच्या आंदोलनाची टिंगल करतात. आपण हेच करायला आलो आहोत का? बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या माणसाला सर्वात कठोर शिक्षा मिळायला हवी होती, पण त्याला जामीन का मिळाला? हा न्याय आहे का? हे मानवीय आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच, जोपर्यंत दोषींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत सर्वांनी याबद्दल बोलणे पाहिजे, तसेच या घटनेचा निषेध करणे थांबवूच नये, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

सीबीआय सर्वोच्च न्यायालयात अपील करणार –

दरम्यान, उन्नाव बलात्कार पीडित प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीपसिंह सेंगर याच्या जामीनाला हरकत घेत सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles