सावंतवाडी : दिनांक ०२ ऑक्टोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सुरू असलेल्या स्वच्छता हीच सेवा या अभियाना अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत व परफेक्ट अकॅडेमीचे संचालक प्रा. राजाराम परब यांच्या मार्गदर्शनाखाली येथे परफेक्ट अकॅडेमी सावंतवाडी / कुडाळ, आरपीडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सावंतवाडी यांच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रशालेच्या प्रांगणात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ”महात्मा गांधी की जय.!”, “जय जवान, जय किसान.!” अशा घोषणा दिल्या. तसेच विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रशालेच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवून सर्व परिसर स्वच्छ केला.
मुख्याध्यापक श्री. धोंड यांनी महात्मा गांधी विषयी आपल्या मनोगतात महात्मा गांधींनी अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे स्वच्छतेचे उपासना व स्वच्छता याचे महत्व विद्यार्थ्यांना कथन केले. गांधीजी यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी १९६५ मधील भारत पाकिस्तान युद्ध व अन्न टंचाईचे दरम्यान शेतकरी व सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी ‘जय जवान जय किसान!’ चा नारा दिला आज या महान नेत्यांच्या विचारांची गरज देशाला आहे असे सांगितले. शेवटी श्री. अमोल खरात यांनी आभार मानले. यावेळी प्रा. आवनीश वर्मा, प्रा. राजू विश्वास, प्रा. तसद्दूक मलिक, श्री. अमोल खरात, श्री. परिमल धुरी, कु. शितल कांबळी, सौ. पूर्वी जाधव व परफेक्ट अकॅडेमी सावंतवाडी व कुडाळ येथील विद्यार्थी उपस्थित होते.


