सावंतवाडी : दोडामार्ग आडाळी येथे औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली असून येत्या चार दिवसात अडीचशे युवकांना रोजगार देणाऱ्या उद्योगाचे भूमीपूजन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून यावेळी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
तसेच ४५ कोटी रुपये मंजूर असूनही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रश्न राजघराण्याच्या सह्या अभावी रखडला आहे. येत्या दोन दिवसात सह्या नाही झाल्या तर हा प्रकल्प नाईलाजाने दुसरीकडे स्थलांतरित करावा लागेल, असेही केसरकर म्हणाले.
गुरुवारी रात्री मंत्री दीपक केसरकर यांनी दूरचित्र प्रणालीद्वारे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते ते म्हणाले, आडाळी एमआयडीसी येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील फार्मासिटिकल कंपनी येणार आहे त्यांनी यासंदर्भात आडाळी येथे येऊन पाहणी केली आहे लवकरच सदर कंपनी या ठिकाणी उद्योग सुरू करणार आहे परंतु त्याआधी येत्या चार दिवसात अडीचशे बेरोजगारांना रोजगार देणारा उद्योग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत तसेच खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच मी स्वतः उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर याआधी आडाळी येथे उद्योग सुरू करण्यास ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत त्यांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे काही प्रमाणात त्या ठिकाणी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी विधी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत लाईट तसेच पाणी यावर काम सुरू असून निश्चितच या ठिकाणी मोठा प्रतिसाद उद्योजकांकडून मिळणार असून शासनही या संदर्भात कटिबद्ध आहे. तालुक्यातील आंबोली, चौकुळ व गेळे येथील वन जमिनीचा प्रश्न सुटला आहे त्या संदर्भातील ३५ सेक्शन उठवण्यात साठी शासनाच्या संबंधित विभागाने हिरवा कंदील दिला आहे त्यामुळे गेले कित्येक वर्षापासून येथील त्यांचा सुरू असलेल्या लढायला आता खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे यासाठी प्रयत्न केलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.
ते पुढे म्हणाले, शिरोडा वेळागर येथील ताज हॉटेलचे भूमिपूजनही लवकरात लवकर होणार आहे परंतु त्या ठिकाणी काही जमीन वगळून मिळण्याची मागणी तेथील जमीन धारकांनी केली होती त्या संदर्भात ग्रामस्थांची बैठक पार पडली यामध्ये जोपर्यंत ग्रामस्थांची हरकत असलेली नऊ हेक्टर जमिनी वगळण्यासंदर्भात सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत कुठलेही बांधकाम सदर भागात होणार नाही याबाबतची याबाबत आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थांची शंका दूर झाली असून लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. टेंडर मिळवण्यासाठी ठेकेदारांकडून बाऊन्सर आणून दादागिरी केली जात असेल तर ती मी मुळीच खपवून घेणार नाही तसेच पैशांची मस्ती चालू देणार नाही, बॅनर बाजी करणाऱ्यांना देखील पाहू. माझ्या मतदारसंघातील लोक चांगले ओळखतात मी कामे केली नसती तर मला तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिले नसते त्यामुळे कोणीही बॅनरबाजी केली तरीही मला फरक पडत नाही लोक माझ्यासोबत आहेत बोलणाऱ्या लोकांना कामे नसल्यामुळे ते बोलत आहेत. मल्टीस्पेशालिटी आणि सावंतवाडी बस स्थानक हा प्रश्न माझ्या आश्वासनापैकी राहिला आहे. तो सोडवणे माझे कर्तव्य आहे.
“”खासदार नारायण राणे हे कडवट शिवसैनिक होते त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्रीपदाचा मान शिवसेनाप्रमुखांनी दिला होता.त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य जर शिवसेनेत (शिंदे गट) येत असेल तर त्यांचे नक्कीच स्वागत होईल””, असेही मंत्री दपक केसरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
फोटो
दिपक केसरकर


