Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

चित्तथरारक – बंदूक साफ करत असताना अचानक गोळी सुटली.! ; नामांकित बिल्डरच्या हातातून आरपार गेली, मुलाच्या अंगावर काचा उडाल्या.

कल्याण : शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर यांच्या स्वसंरक्षणासाठी परवाना असलेली बंदूक साफ करताना अचानकपणे गोळी लागली आहे. बंदुकीची गोळी सुटून त्याच्या हाताच्या डाव्या पंजाच्या आरपार गेली आहे. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले आहे. शिवाय त्यांच्या मुलाच्या पायाला काचेचे तुकडे  लागल्याने मुलगाही  जखमी झालाय. दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून  तपास सुरू केला आहे.

अचानकपणे बंदूकीतून गोळी सुटून हाताच्या पंजाच्या आरपार –

अधिकची माहिती अशी की, कल्याण चिकन घर येथील कार्यालयात बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर ,त्यांचा मुलगा शामल व अन्य साथीदार बसले होते. मंगेश गायकर यांनी आपल्याकडील  स्वरक्षणासाठी असलेली बंदूकीची  साफसफाई करून चेक करीत  असताना अचानकपणे बंदुकीतून गोळी सुटून त्याच्या हाताच्या पंजाच्या आरपार गेली. त्यामुळे ते जखमी झाले तर या घटनेत काचेचे तुकडे त्याचा मुलगा शामल याच्या पायाला लागल्या आहेत. त्यामुळे मुलगाही गंभीररित्या जखमी झालाय.  पिता आणि पुत्र दोघांनाही  उपचारासाठी खासगी रुग्णालयात  दाखल केल्याची माहिती आहे.  पोलिसांनी त्वरित घटनास्थळी  धाव घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे.

गोळीने कार्यालयाची काच फुटली आणि तुटलेली काच त्यांच्या मुलाला लागली –

पोलीसांच्या माहितीनुसार, कल्याणमधील एक बांधकाम व्यावसायिक आपली बंदुक साफ करत असताना अचानक गोळीबार झाला. मंगेश गायकर असे या बिल्डरचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गायकर बंदूक साफ करत असताना गोळीबारामुळे त्यांच्या हाताला गोळी लागली आणि त्यानंतर त्याच गोळीने कार्यालयाची काच फुटली आणि तुटलेली काच त्यांच्या मुलाला लागली. सध्या डीसीपी आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दोघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles