सावंतवाडी : सिंधुदुर्गचे सुपुत्र, परफेक्ट अकॅडेमीचे संचालक तसेच ज्ञानज्योत अकॅडेमी पुणे या संस्थेचे सीईओ पेरेंटिंग कोच, अभ्यासू व्यक्तिमत्व प्रा. राजाराम परब यांचा नुकताच ‘राज्यस्तरीय एज्युकेशनल आयडॉल’ पुरस्काराने स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य तर्फे मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

- oplus_263200
प्रा. राजाराम परब यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय एज्युकेशनल आयडॉल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण अण्णा नेरकर, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत दारोळे, ज्ञानज्योत अकॅडेमी, पुणेचे संचालक प्रा. गणेश हुरसाळे, प्रा. विजयकुमार कौदरे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रा. परब यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, आरोग्य, पत्रकारिता, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योजक, वैद्यकीय, प्रभावशाली राजकीय युवा व्यक्तिमत्व आणि प्रशासन आदी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या वतीने गौरव करण्यात आला.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी दुरुस्त प्रणालीद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहून स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले व सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजाराम परब यांनी केले. आभार प्रदर्शन व्यवस्थापक कृष्णा तेलंग यांनी केले. प्रा. परब यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
प्रा. परब यांना शिक्षण क्षेत्रातील तब्बल १६ वर्षे असा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी अनेक प्रेरणादायी व्याख्यानातून हजारो विद्यार्थी व पालक यांचे प्रबोधन केले आहे. तसेच त्यांनी ‘यशस्वी भाव.!’ ह्या पुस्तकाचे लेखन केले आहे. ते शिक्षकांचे ट्रेनर असून हजारो शिक्षकांना त्यांनी आपल्या मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली असून त्यांना शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.
तसेच प्रा. परब विविध सस्थांमध्ये सहभाग देत आहेत. यात ते संचालक अकॅडेमी अकॅडमी, सिंधुदुर्ग, सीईओ, ज्ञानज्योत अकॅडेमी, पुणे व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे समुपदेशक म्हणून देखील कामगिरी करत आहेत.
अशा गुणवंत शिक्षण रत्नाला पुरस्कार देताना स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाला अभिमान वाटत असून विशेष आनंद होत असल्याची भावना स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील व्यक्त


