सावंतवाडी : गेले कित्येक दिवस आजारी असलेले शिंदे भगिनीचे पती यांचे मागच्या महिन्यामध्ये निधन झालं आणि शिंदे भगिनी व त्यांची दोन लहान मुली पूर्णपणे निराधार बनली. आज पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी व काळसे पंचकोशी अपंग सेवा संस्था यांच्या माध्यमातून शिंदे भगिनीला रोख पाच हजार रुपये व राशन तसेच डिमिलो दिव्यांग भगिनींना आर्थिक सहाय्य करण्यात आले.
या वेळी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खालील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, काळसे पंचक्रोशी सेवा संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी, रूपा मुद्राळे, अशोक पेडणेकर, शरदीनी बागवे, प्रसाद कोदे, सुजय सावंत, हेलन निबरे, शरद पेडणेकर, शेखर सुभेदार व शाम हळदणकर यांनी सहकार्य केले.
सावंतवाडी शहरात व गावागावांमध्ये निराधार वृद्ध व गोरगरीब, आजारी व्यक्ती तसेच निराधार, विधवा महिलांना सहकार्य करण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून नेहमीच आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तू संस्थेच्या व दानशूरांच्या मदतीने घरपोच करण्याचे काम नेहमीच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असते.
सावंतवाडी तालुक्यातसह जिल्ह्यामध्ये नुकताच नवरात्र उत्सव उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नवरात्र उत्सव मंडळांना एक नम्रपणे नम्र आवाहन करत आहे की देवीकडे जमलेले टिकाऊ अन्नपदार्थ काही प्रमाणात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडे जमा केल्यास आम्ही गरजू व निराधार व्यक्तींपर्यंत पोचवू शकू व या अन्नदानाचे पुण्य आपल्या मंडळाला नक्की लाभेल असे मत रवी जाधव यांनी व्यक्त केले. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मंडळांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जवळ अन्नधान्य जमा करून सहकार्य करण्याचे नम्र आवाहन रवी जाधव यांनी केले आहे.


