Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

SPK महाविद्यालयात फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया व विनायक दळवी चॅरीटेबल फाऊंडेशन मुंबईच्या सौजन्याने उद्या प्लास्टिक प्रदूषण जनजागृती अभियान.

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये सोमवार दि.14 ऑक्टोबर 2024 रोजी फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने प्राणीशास्त्र पदव्यूत्तर विभाग श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी ( स्वायत्त) व विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी प्लास्टिक प्रदूषण जनजागृती अभियान राबवले जाणार आहे.जागतिक स्तरावर जलवायू व जमीन प्रदूषणाचा प्रश्न खूप गंभीर होत चालला आहे. विशेषतः समुद्रातील प्लास्टिक कचरा समुद्रातील लाखो सजीवांसाठी जीवघेणा ठरत आहे. किनारपट्टीत राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी सामान्य नागरीक व विद्यार्थ्यांसाठी प्लास्टिक द्वारे होणारे सागरी प्रदूषण या विषयावर जनजागृती मोहीम आखली आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमसावंत भोंसले उपस्थित राहाणार आहेत. तसेच विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष प्रा. विनायक दळवी,  फिशरी सर्व्हे ऑफ इंडियाचे वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ.अशोक चव्हाण,डाॅ.हर्षवर्धन जोशी ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळी बांधव व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.सागरी प्लास्टिक प्रदूषण या गंभीर प्रश्नासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळी बांधव व पर्यावरणप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles