Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तब्बल चार तास वीज गायब, रुग्णांचे हाल.! ; सामाजिक बांधिलकी व उदयनराजे प्रतिष्ठानचे संतोष तळवणेकर यांच्याकडून जनरेटरची दुरुस्ती. ; आठ दिवसात शासनाकडून इन्व्हर्टरची व्यवस्था न झाल्यास सामाजिक बांधिलकी व उदयनराजे प्रतिष्ठानकडून नवे इन्व्हर्टर बसवणार.! – रवी जाधव.

सावंतवाडी : आज सोमवार असल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तब्बल चार तास लाईट नव्हती. गेल्या वर्षापासून इन्व्हर्टर ना दुरुस्ती आहे त्यात जनरेटर मध्ये बिघाड याचा परिणाम पेशंट तपासणीवर त्याच प्रमाणे रक्तपेढी, एक्स-रे, इसीजी मशीन, सिटीस्कॅन मशीन यंत्रणेत तब्बल चार तास बंद पडल्याने गावागावा वरून आलेल्या पेशंटचे अथोनात हाल झाले. जवळपास 50% पेशंट परतून गेले याबाबतची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मिळाली असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली व पेशंटचे होणारे हाल पाहताच त्यांनी तत्काळ उदयनराजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर यांच्याशी तात्काळ संपर्क साधून जनरल ची त्वरित दुरुस्ती करून घेतली व लाईट सेवा सुरळीत केली.
त्यावेळी उपचार घेत असलेले पेशंट त्याचप्रमाणे सिस्टर व डॉक्टर स्टाफ यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, संतोष तळवणेकर, शिवा गावडे यांचे आभार मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles