Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

Big Breaking – सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री ; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा.

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या चर्चेत आहे. माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या घरासह शूटिंगच्या वेळी सेटवरही तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खान धमकी प्रकरणाला पोलिस कसून तपास करत आहे. याआधी सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. या प्रकरणाचाही तपास सुरु आहे.

पनवेलच्या फार्महाऊसवर सलमान खानला मारण्याचा प्लॅन –

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 10 आरोपींना अटक केली आहे. याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. नवी मुंबई आणि मुंबई पोलिस या प्रकरणात सखोल चौकशी करत आहेत. सलमान खान गोळीबार प्रकरणात अटकेत असलेला शार्प शुटर सुक्खा याने पोलिस तपासात धक्कादायक खुलासा केला आहे. सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन होता, अशी धक्कादायक माहिती शार्प शुटर सुक्खाने पोलिसांना दिली आहे.

शार्प शुटर सुक्खाला हरियाणामधून अटक –

हरियाणा आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुक्खा नावाच्या बिश्नोई टोळीच्या सदस्याला पानिपत येथून अटक करण्यात आली. नवी मुंबईतील पनवेल शहर पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सलमान खानकडून सुपारी घेणाऱ्या बिष्णोई टोळीच्या शार्प शूटरला अटक केली. सलमान खानच्या पनवेल येथील घरी त्याने रेकी केली होती.

सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसची रेकी –

हरियाणाच्या पानीपत येथून शॉर्प शुटर सुक्खा याला सलमान खान धमकी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या सांगण्यावरुन काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या फार्महाऊसची रेकी केल्याचं त्याने मान्य केलं. आहे. सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर येताच त्याला मारण्याचा प्लॅन होता, असंही सुक्खाने कबूल केलं आहे. याशिवाय, त्याने फार्महाऊसची रेकी करताना गार्डसोबतही मैत्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सलमान खान प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना शार्प शुटर सुक्खाबाबत टीप मिळाली होती. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी हरियाणाच्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत पानीपतमधील हॉटेलमधून सुक्खाला अटक केली. त्याने ओळख लपवण्यासाठी दाढी वाढवली होती. पोलिसांनी अटक केलं तेव्हा सुक्खा नशेत होता, त्याला कसलीच शुद्ध नव्हती.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles