आंबोली : वेंगुर्ला बेळगाव रस्त्यावर आंबोली चेकपोस्ट येथे टेम्पो निर्दयीपणे जनावरांना कोंडून वाहतूक केल्याप्रकरणी मंदार मंगेश कर्पे (वय २६, राहणार घावनळे खोचरेवाडी, तालुका कुडाळ) आणि अश्पाक मोहम्मदगौस जकाती (वय २६, राहणार कुडाळ बाजारपेठ, मारुती मंदिर जवळ, तालुका कुडाळ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी एका स्वराज माझा टेम्पो (गाडी क्रमांक एम एच ०७ एजे ५९५९) सह वाहनात आढळून आलेल्या ६ जनावरे मिळून ७ लाख ८७ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबोली चेक पोस्टवर गुरांची वाहतूक करणारा टेम्पो तेथे कार्यरत असलेल्या पोलिसांनी अडवला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ६ जनावरे कोंडून त्यांची वाहतूक केली जात होती. यात एका करड्या रंगाचा रेडा ( ५ वर्षे, किंमत १५ हजार रुपये), एक काळ्या रंगाचा रेडा (३ वर्षे, किंमत १० हजार रुपये), आणखी एक काळ्या रंगाचा रेडा (३ वर्षे, किंमत १० हजार रुपये), मुऱ्हा जातीचा एक रेडा (३ वर्षे, किंमत १२ हजार रुपये) आणि दोन काळ्या रंगाच्या म्हशी (प्रत्येकी किंमत २० हजार रुपये) यांचा समावेश होता. यातल्या एका म्हशीच्या डाव्या कानात 103438285100 असा क्रमांक असलेला टॅग होता.
सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२४ अंतर्गत महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५ अ, ५ ब , ९ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११ ( १ ) डी, ११ ( १) ई , ११ ( १ ) एफ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९, आणि मोटर वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४, ६६/१९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपींनी स्वराज माझा टेम्पोमध्ये निर्दयीपणे आणि असुरक्षित रित्या जनावरांची कोंडलेली वाहतूक करताना त्यांना चारा-पाण्याची व्यवस्था न करता भरधाव वेगाने नेले. यामुळे पोलिसांनी निर्दयपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, मनीष शिंदे, आणि अभिजित कांबळे यांनी ही कारवाई केली तर प्रकरणी आंबोली चेक पोस्टवरील पोलीस हवालदार दीपक भैरू शिंदे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
जनावरांच्या निर्दयी वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल ; टेम्पोतील ६ जनावरांसह ७ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


