Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

दहावी-बारावीच्या परीक्षेत फॉर्म नंबर १७ ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत फॉर्म नंबर १७ भरून खासगीरीत्या ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अति विलंब शुल्क भरून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२४ परीक्षेपासून संपर्क केंद्र बंद करून सर्व माध्यमिक शाळांमधून फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इ. १० वी व इ. १२वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

खाजगी विद्यार्थ्यांना इ. १० वी व इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीनेच भरावयाचे असल्याने कोणाचाही ऑफलाईन (offline) अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे मंडळाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळाचा वापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी /इंग्रजीमधून उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. या संदर्भात अधिक माहितीसाठी शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता १) शाळा सोडल्याना दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, २) आधारकार्ड,  ३) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोर्टा स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles