देवगड : देवगड तालुक्यातील मोंडपार उबाठा शाखाप्रमुख भालचंद्र धोंडू तिर्लोटकर, माजी उपशाखा प्रमुख विजय तांबे, आणि उपशाखाप्रमुख लहू तिर्लोटकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.
आमदार नितेश राणे देवगड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. महायुतीच्या माध्यमातून त्यांनी देवगडला नवनवीन विकास प्रकल्प आणले आहेत. रोजगारनिर्मिती, शिक्षण, आणि आरोग्य सुविधांच्या विस्तारात त्यांचा विशेष सहभाग आहे. देवगड तालुक्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नितेश राणे हे सक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. स्थानिकांच्या भल्यासाठी झटणारे नितेश राणे देवगडच्या प्रगतीचा पाया ठरत आहेत. असे प्रवेश करणाऱ्यांनी सांगितले
यावेळी बाळा खडपे, संदीप साटम, बंड्या नारकर, अमोल तेली, गणेश राणे, रवी पाळेकर, आणि उत्तम बिरजे उपस्थित होते.
आ. नितेश राणे यांचे कार्यकर्तृत्व दमदार, प्रभावित होऊन मोंडपार येथील उबाठाचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, माजी उपशाखा प्रमुखांनी केला भाजपात प्रवेश.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


