सावंतवाडी : माझी उमेदवारी कायम असून लोकांचा मला मनापासून प्रतिसाद लाभत आहे. मी लोकांना शब्द दिला तो आज पाळाला. आजपर्यंत मी जनतेसाठी जे काही केले, त्यांचा आदर राखून माझी उमेदवारी करीत आहे., असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार अर्चना घारे – परब यांनी केले.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होते. यावेळी पुंडलिक दळवी, देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, रीतिक परब, विवेक गवस, श्री. पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, संजय भाईप, विनायक परब, संतोष जोईल, नवल साठेलकर, ऋत्विक परब, विवेक गवस, अवधूत मराठे, साबाजी रेडकर, निलेश गावडे, नोबर्ट माडतीस, पंढरी राऊळ यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, अर्चना घारे – परब पुढे म्हणाल्या, माझी लढाई म्हणजे कोकणच्या जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मी प्रचाराचा नारळ उद्या फोडणार असून उद्या मंगळवारी सकाळी भालावल येथे ग्रामदेवतेच्या पायी नतमस्तक होवून प्रचाराचा नारळ वाढवणार आहे. मी माझ्या सावंतवाडी मतदारसंघातील जनतेला दिलेल्या शब्दाला जागले यांचं समाधान असून जनतेचा आशीर्वाद लाख मोलाचा आहे. मी लढणार आणि जिंकणार आहे, असे देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सौ. अर्चना घारे – परब पुढे म्हणाल्या मी 2019 ला देखील ऐनवेळी माघार घेतली. पण मी कामं करीत राहिले पण आताही शेवटी निर्णय माझ्या विरोधात गेला, म्हणून मी नाराज नाही. जनतेचं माझ्यावर प्रचंड प्रेम असल्यामुळे मी उमेदवारी कायम ठेवली आहे. माझ्यावर प्रचंड पदबाव असताना देखील मी माझी उमेदवारी कायम ठेवली कारण जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद मला लाभला आहे, असेही त्या म्हणाल्या.
अर्चना घारेंची निशाणी पाकीट –
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून अर्चना घारे परब यांना पाकीट ही निशाणी मिळाली असून इव्हीएम मशीनवर पाकीट ही निशाणी तीन नंबरवर असणार आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.


