Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

मला मिळत असलेल्या जनसमर्थनापुढे विरोधक हतबल : विशाल परब. ; सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार परबांना जनतेचा ‘विशाल’ अन् उत्स्फूर्त पाठिंबा!

सावंतवाडी : मला माझ्या कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार युवा बांधव यांच्याकडून प्रचंड प्रेम आणि आपुलकी मिळत आहे. मला मिळत असलेल्या जनतेच्या समर्थनापुढे विरोधक हतबल झाल्यामुळे माझ्यावर अनेक लोकं आरोप करीत आहेत आणि त्यांनी ते करत राहावे, असे प्रतिपादन युवा नेते विशाल परब यांनी केले आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी आता राजकीय पक्षांनाही भारी पडू लागली आहे. महायुतीकडून विशाल परब यांच्या विरोधात स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते मैदानात ठाकले असतांनाच विशाल परब यांच्यासाठी जनतेचा पाठिंबा मात्र दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. माझ्या विरोधात अनेक दिग्गज नेते स्टार प्रचारक म्हणून उतरतील, मात्र माझ्यासाठी सर्वसामान्य शेतकरी, बेरोजगार तरुण आणि शेतात राबणाऱ्या मायमाऊली याच माझ्या स्टार प्रचारक असतील, असे भावनात्मक प्रतिपादन विशाल परब यांनी केले होते.

 

या आवाहनाला खरोखरच प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत असून विशाल परब यांच्या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी महिला, युवक, शेतकरी यांची गर्दी होताना दिसत आहे. एकंदरीतच, विशाल परब यांच्या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच नवा इतिहास घडणार आणि अपक्ष उमेदवार येथे आमदार होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles