Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

.. तर हकालपट्टीचा माझा प्रश्नच नाही.! : भास्कर परब. ; अर्चना घारे – परबांसह पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरून राष्ट्रवादीत संभ्रम.!

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ अर्चनाताई घारे परब या पक्षाने उमेदवारी डावलल्याने लखोटा या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून लढवीत आहेत, याबाबत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता, त्याप्रमाणे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेश स्तरावर पोहचविण्याचे ठरले. त्याप्रमाणे सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष यांना पाठविण्यात आला होता,त्या अहवालाचा कुठलाही निर्णय प्रदेशाध्य स्तरावरून प्राप्त होण्याअगोदरच ९ नोव्हेंबर रोजी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्चना घारे परब यांचेसह वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी या तीन तालुका अध्यक्ष यांना पक्षातून बडतर्फ केल्याचे जाहीर केले होते, मग जिल्हा सरचिटणीस म्हणून भास्कर परब यांना बडतर्फीचे अधिकार नसताना भास्कर परब यांचे नांव बडतर्फी घटनेला जोडणे चुकीचे असून तसेच अन्य काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी होणार असे माझ्या नावाचा उल्लेख करून सनसनाटी निर्माण केली यास माझा काडीमात्र संबंध नाही, पक्षाचे पदाधिकारी वा कार्यकर्त्यांना बडतर्फ करण्याचे अधिकार हे प्रांताध्यक्ष यांनाच आहेत.

तसेच माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी ९ नोव्हेंबरलाच ज्यांना बडतर्फ केले त्यामुळे पून्हा बडतर्फी माझ्या नांवे कशी,असा प्रश्न उपस्थित करून कालच्या बडतर्फीशी माझा संबंध नाही, तसेच माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी ९ नोव्हेंबरला कशाच्या आधारे त्यांची बडतर्फी केली होती याचे स्पष्टीकरण द्यावे,

श्री भास्कर परब
जिल्हा सरचिटणीस एसपी राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles