सावंतवाडी : निवडणूक अर्ज भरल्यापासून ते आता निवडणुकीला काही तास शिल्लक असताना देखील धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या मुलावर 2 वेळा हल्ला झाला आहे. तो हल्ला कोणी केला हे सर्वांना माहीत आहे. दहशतवाद रोखण्यासाठी मला भरभक्कम साथ द्या!, माझ्या जिवाला आणि माझ्या कुटुंबीयाला देखील धोखा आहे. मात्र तुमचे एक मत माझा जीव वाचविण्यासाठी खूप महत्वाचे आहे. गेले 15 वर्षे हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. मात्र यावेळी केवळ तुमचं एक मत द्या!, त्या मताने जो काही विकास या मतदारसंघात राहिला आहे तो करून दाखवेन. फक्त तुमचं एक मत यावेळी मला द्या!, अशी भावनिक हाक पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांनी मतदारांना घातली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले, बबन साळगावकर, उमेश कोरगावकर, रमेश गावकर, सुनील गावडे, इफ्तिकार राजगुरू आदी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते
दहशतवाद रोखण्यासाठी मला भरभक्कम साथ द्या! ; राजन तेली यांची मतदारांना भावनिक साद.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


