सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल परब हे सावंतवाडी मतदार संघातून नशीब आजमावत आहेत. आज सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी त्यांनी सपत्नीक चराठा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा नंबर एक येथे मतदान केले.
यावेळी विशाल परब म्हणाले येत्या 23 तारखेला संपूर्ण मतपेट्या या विशालमय होणार असून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने एक युवा आमदार या मतदारसंघाला लाभणार आहे. जनतेच्या मनामध्ये प्रचंड राग असून गेल्या पंधरा वर्षात येथे काही झाले नाही. त्यामुळे यावेळी बदल नक्कीच घडणार असून माझी उमेदवा,री ही जनतेची उमेदवारी आहे. त्यामुळे गुलाल आपलाच असणार असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी वेदिका परब आणि त्यांचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


