सावंतवाडी : येथील उभा बाजारमध्ये वास्तव्यास असणार्या श्रीमती शुभदा श्याम हळदणकर (वय 78 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या किरण व कांचन हळदणकर यांच्या काकी होत. मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी या महिलेचे निधन झाले असून तिच्या पश्चात तिची मुलगी सौ. शितल हळदणकर आहे. इंटरनॅशनल कलाकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांच्या त्या सून होत्या. चिताराळी येथे कै. श्याम हळदणकर यांचे टीव्ही रिपेरिंगचे शॉप होते. तसेच पिठाची गिरण असलेले किरण हळदणकर यांच्या त्या काकी होत्या. त्यांच्या निधनाने हळदणकर कुटुंबामध्ये व उभा बाजार परिसरामध्ये शोककळा पसरली असून त्यांचा अंत्यविधी सायंकाळी सात वाजता उपरलकर स्मशानभूमीमध्ये होणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी दिली आहे.
सहवेदना – सावंतवाडी उभाबाजार येथील शुभदा हळदणकर यांचे निधन!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


