सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आरोंदा संचलित, माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या माजी विद्यार्थी सस्नेह महामेळाव्याचे आयोजन ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. बळवंत केरकर उपस्थित राहणारअसून स्वागताध्यक्ष लेफ्टनंट कर्नल पद्माकर नाईक असणार आहेत. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत राऊळ महाविद्यालय कुडाळ येथील माजी प्राचार्य डॉ. अरुण पणदूरकर असणार आहेत.
तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. पी. वाय. नाईक, श्री. संजीव नाईक, आरोंदा सरपंच गीतांजली वेळणेकर, सूर्यकांत उर्फ बाबी पोखरे, प्राध्यापिका स्मिता पार्सेकर, शाम नाईक, संदीप पेडणेकर तसेच कार्यक्रमाचे स्नेहवर्धक म्हणून अध्यक्ष संदेश परब, उपाध्यक्ष रघुनाथ उर्फ बबन नाईक, सचिव वासुदेव देऊलकर, सहसचिव अशोक धर्णे, खजिनदार रुपेश धर्णे, तसेच नारायण आरोंदेकर, आत्माराम आचरेकर, रामचंद्र कोरगावकर, केदार रेगे, सौ. स्नेहा गडेकर, आनंद नाईक तसेच प्राचार्य सिद्धार्थ तांबे आणि आरोंदा हायस्कूलच्या तसेच आरोंदा पंचक्रोशीतील माजी विद्यार्थ्यांकडून उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVT –




