Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आंतरविद्याशाखीय परिषदा काळाची गरज.! : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के.

वैभववाडी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा अंतर्गत, (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने आयोजित दि.२९ नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवसीय “Innovations and Global Perspective on Humanities, Commerce & Management and Science & Technology” (मानवविद्या, वाणिज्य आणि व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील नवकल्पना आणि जागतिक दृष्टीकोन) या विषयावरील आंतरराष्ट्रीय बहुशाखीय परिषदेचे उद्घाटन प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने आंतरविद्याशाखीय परिषदा काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी. शिर्के यांनी केले.


याप्रसंगी व्यासपीठावर श्रीमती. शमा निमकर, कंटेंट मार्केटर, पत्रकार व सहसंस्थापक (34 East UK), महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. सदानंद रावराणे, सहसचिव श्री. विजय रावराणे व श्री. सत्यवान रावराणे, कार्यकारी मंडळाचे विश्वस्त श्री. प्रभानंद रावराणे, श्री. शरदचंद्र रावराणे, स्थानिक समिती अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे यांनी उपस्थित राहुन परिषदेला शुभेच्छा दिल्या. श्री. विलास तावडे, मा. व्य. संचालक व माजी मुख्याधिकारी, एसार ऑईल व गॅस, यांनीही परिषदेस शुभेच्छा दिल्या. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधक यांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, IQAC समन्वयक डॉ. डी. एम. सिरसट, PM- USHA समन्वयक, डॉ. के. पी. पाटील, परिषदेच्या समन्वयक डॉ. डी. एस. कोरगांवकर, सह-समन्वयक प्रा. एस. बी. पाटील, सचिव प्रा. पी. एम. ढेरे व सह-सचिव प्रा. व्ही. व्ही. शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. आर. बी. पाटील व सुत्रसंचालन प्रा. एन. ए. कारेकर यांनी केले.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles