कणकवली : राज्यांना विशेष अनुदान देण्याच्या योजने अतंर्गत सिंधुदुर्गातील गुलदार अंडर वॉटर म्युझियम आणि पाणबुडी पर्यटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 46.91 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हाच्या आकर्षणात यापुढे अधिकच भर पडणार आहे. भारत सरकार व आदरणीय मोदीजी यांचे सिंधुदुर्गातील जनतेच्या वतीने व खासदार या नात्याने व्यक्तीशः शतशः आभार मानून खासदार नारायण राणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
ADVT-




