Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

शिंदे साहेबांना सांगत होतो, तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल.! ; बच्चू कडू सर्व काही सांगून गेले.

मुंबई : राज्यात सध्या बहुमत मिळून ही महायुतीचं सरकार स्थापन होत नसल्याने विरोधकांनी यावरुन त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. ५ डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं चंद्रशेखर बावणकुळे यांनी जाहीर केलं आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन गेले अनेक दिवस सस्पेंस कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदावरचा दावा सोडला असला तरी ते गृहमंत्रीपदाबाबत आग्रही आहेत. पण भाजप हे खातं सोडण्यास तयार नाही. या सगळ्या राजकीय परिस्थितीवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू यांनी आज दिव्यांग पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. हरल्यानंतर खचू नये असे त्यांनी म्हटलं. ते म्हणाले की, दिव्यांगांचे काही महत्वाचे प्रश्न राहिले होते. आता ते सत्तेकडून कसे सोडवता येतील हे पाहावं. सरकारला पाहिले निवेदन देऊ, नाही मानले तर मोठ्या आंदोलनाल सरकारला सामोरे जावं लागेल. दिव्यांगांचे प्रश्न, विधवा महिलांचे प्रश्न आणि शेतकरी प्रश्नासाठी आम्ही लढू असं ही ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले?

बच्चू कडृ म्हणाले की, मी शिंदे साहेबांना सांगत होतो की तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल. कारण दोन वाजता सुद्धा सामान्य माणसाला भेटणारा मुख्यमंत्री मी पाहत होतो. त्यामुळे भाजपला वाटले होते की शिंदे साहेबांना दाबून घेऊ. सत्तेत असताना ते दाबू शकले नाही. त्यांचा कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होते.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका –

देवेंद्र म्हणायचे की माझ्या एका फोनवर बच्चू भाऊ आले. तो फोन सत्तेबद्दलचा होता. त्यानंतर त्यांचा कधीही कामासाठी फोन आला नाही. सत्तेसाठी देवेंद्र यांना फोन करता आला, पण मित्रता टिकवण्यासाठी एक फोन करता आला नाही. असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

ईव्हीएमवर शंका..? 

‘माझं म्हणणे आहे की बॅलेट नाही तर मतदान नाही. काही ठिकाणी शंका वाटते. ज्या उमेदवारांच्या मुख्यमंत्र्याच्या सभेत चारशे लोकं नव्हते, टू व्हीलर रॅली चारशे लोकांची होती, आणि आमची पंधरा हजार लोकांची होती. प्रत्येकाच्या डोक्यात होते की बच्चू कडू जिंकणार. पण पडला कसा? हा चिंतेचा विषय आहे. असं बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया –

हा मुद्दा राजकीय आणि राष्ट्रहिताचा आहे. प्रत्येकाला दोन अपत्य असली पाहिजे. कधी कधी तर आम्हाला एकावर ही यावं लागेल. वाढलेली लोकसंख्या पाहता सगळ्यांसाठी बंधने असली पाहिजे.

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले की, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जेव्हा ते सोबत होते तेव्हा नाही म्हटलं पाहिजे होते. निवडणूक व्हायचे अगोदर जर बोलले असते तर दम राहिला असता. आता काही फायदा नाही.

सत्तेमुळे आज जो घोटाळा करता आला तो शिंदे यांचे पायथ्यावर पडला. भाजपने एक चांगले काम केले की, राज्यातलं विरोधी पक्ष संपवले. मित्र पक्षाची तनातानी सुरू केली. तुमच्या शिवाय पण सरकार बनवू शकतो अशा आकडेवारीत भाजपा गेलीये.

मुख्यमंत्री कोण होणार?

मला वाटते भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करेलच. नाही केले तर मग मी तुम्हाला सांगेल की कोणत्या पार्टीचा होईल. त्यांनी म्हटले होते की कर्ज माफ करू. आता वाट पाहू , होऊ द्या आता मुख्यमंत्री.

ईव्हीएमबाबत ते म्हणाले की, ती मशीन आहे, त्यात छेडखानी होते. भाजप सत्त्याकडे जाणारी पार्टी म्हणतात, सत्य प्रमाण असे ते म्हणतात. बटन दाबण्याचा प्रोसेस तशीच ठेवावी. पण vvpat बाहेर आले पाहिजे. बॅलेटवर मतदान केंद्र आणि क्रमांक राहायचं त्यामुळे माझं मत कुठे गेले ते समजायचे. आता निवडणूक आयोग सांगू शकते का माझं मतदान कुठे गेले. राज्यघटनेने अधिकार दिला तसा मतदान कुठे गेले ते पाहण्याचा अधिकार आहे. पावती येते त्यावर मतदार क्रमांक का टाकत नाही तुम्ही. त्यावर सही घ्या. वाटलं तर हे मॅन्युअली मोजता येईल. यापूर्वी एखाद्या नेत्याला सव्वा, दीड लाख मत भेटायचे पण आता सरासरी एक लाख सव्वा लाख मतं भेटतात. हे कशाचे द्योतक आहे. लाडक्या बहीणच्या नावाने हा प्रकार सुरू आहे. त्यावर पारदर्शकता येणे गरजेचे आहे.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles