नितीन गावडे
वेंगुर्ले : मुंबई विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले अर्थशास्त्र विभागाच्या वतीने उद्योजकता विकास या विषयाच्या अनुषंगाने प्रकल्प अहवाल (क्षेञ भेट) साठी वेंगुर्ले येथील “ञिमुर्ती परफ्यूमरी वर्क्स” या उद्योगाला भेट देण्यात आली, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने तसेच नवसंयोजन यशस्वीतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या भेट उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्नावली तयार करुन या उद्योजकाचे मालक श्री.अभिषेक राजीव वेंगुर्लेकर यांच्याकडून उद्योकीय प्रक्रियेसंदर्भात माहिती मिळवली तसेच श्री.वेंगुर्लेकर आणि त्यांच्या कामगारांनी प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.

यावेळी विद्यार्थी सुद्धा उद्योजकीय प्रक्रीयेत सहभागी झालेत.
या क्षेञ भेट उपक्रमावेळी बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले चे प्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डाॅ.एम.बी.चौगले , संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एम.आर.नवञे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अर्थशास्त्र विभागाचे डाॅ. जी.पी.धुरी , वाणिज्य विभागाचे डाॅ. एस.व्ही.परुळकर उपस्थित होते.
ADVT :



