कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवली येथे दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे द्वितीय सत्र प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सत्र प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकुण २५ महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होणार आहेत.या प्रशिक्षणासाठी डॉ.कुणाल जाधव ( प्राध्यापक , आजीवन व विस्तार विभाग मुंबई, विद्यापीठ) तसेच शिक्षण सरक मंडळाच्या चेअरमन डॉ.प्रा.सौ. राजश्री साळुंखे, व अन्य मार्गदर्शक उपस्थित राहणार आहे.
या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे ,जिल्हा समन्वयक डॉ.
राजेंद्र मुंबरकर, विभाग प्रमुख प्रा.प्रियांका लोकरे, डॉ. सुरेश हुसे यांनी केले आहे.
ADVT :



