Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

राहुल द्रविडच्या मुलाची कमाल, धावांचा पाडला पाऊस.! ; समोरच्या टीमची लावली वाट.

मुलापाडू : टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि हेड कोच राहुल द्रविड यांची मुलं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून क्रिकेट विश्वात स्वत:ची ओळख बनवत आहेत. राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समितने मागच्या काही महिन्यात वेगवेगळ्या टुर्नामेंटसमध्ये दमदार प्रदर्शन केलय. आता त्यांचा लहान मुलगा अनवय द्रविड सुद्धा आपले वडिल आणि मोठ्या भावाप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात फलंदाजीने धाक निर्माण करतोय. अनवयने विजय मर्चेंट ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून खेळताना दमदार शतक झळकावलं. टीमला आवश्यक 3 पॉइंट्स त्याने मिळवून दिले.

 

 राहुल द्रविडचा मुलगा अनवय आला अन्… 

संघाच्या यशामध्ये योगदान

ओपनर्सची शतकं आणि अनवच्या चांगल्या इनिंगच्या बळावर कर्नाटकने 4 विकेट गमावून 441 धावा केल्या. झारखंडवर 54 धावांची आघाडी घेतली. मॅच ड्रॉ झाली. पण पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या आघाडीच्या बळावर कर्नाटकला 3 पॉइंट्स मिळाले. झारखंडला फक्त एक पॉइंटवर समाधान मानावं लागलं. अनवयने वडिला राहुल द्रविड यांच्याप्रमाणे दीर्घकाळ खेळपट्टीवर उभ राहून संघासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावली. संघाच्या यशामध्ये योगदान दिलं.

समित द्रविड सुद्धा भारताच्या अंडर-19 टीममध्ये

अनवयच्या आधी राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समितने सुद्धा आपली ओळख बनवली आहे. त्याला काही महिन्यांपूर्वीच भारताच्या अंडर-19 टीममध्ये स्थान मिळालं. त्याला ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 टीम विरुद्ध अनऑफिशियल टेस्ट मॅच खेळायची होती. दुखापतीमुळे तो हा सामना खेळू शकला नाही.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles