Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या युवकाची जोरदार धुलाई ; सावंतवाडीतील घटना, पालकांनी राहावे सतर्क.

सावंतवाडी : सावंतवाडी गोठण परिसरात राहणाऱ्या एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीला भर रस्त्यावर अडवून छेड काढल्या प्रकरणी बाहेरचा वाडा परिसरात राहणाऱ्या एका युवकाची मुलीच्या आईने व नागरिकांनी यथेच्छ धुलाई करुन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र सदरचा युवक सतरा वर्षाचा अर्थातच अल्पवयीन असल्याने त्याला समज देऊन नंतर सोडून देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील गोठण परिसरात राहणारी अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी दुकानात जात होती. तीला एकटी जात असल्याचे पाहून त्या युवकाने आपली गाडी थांबवून तिला मागून पकडण्याचा प्रयत्न केला.  त्यावेळी त्या छोट्या मुलीने प्रसंगावधान राखत आपल्या शेजारीच असलेल्या घरात जाऊन आईला ही घटना सांगितली. आईने आपली दुचाकी बाहेर काढून त्या युवकाचा पाठलाग केला व ग्रामस्थांच्या मदतीने पकडून यथेच्छ धुलाई केली.

सदर युवकाला डोंगरे पाणंद रोडवर पकडले. आपली दुचाकी पळवत असताना रस्ते माहिती नसल्याने भरधाव गाडी चालविण्याच्या नादात विजेच्या खांबावर ठोकली व नागरिकांच्या तावडीत तो सापडला.
त्याची यथेच्छ धुलाई करुन त्याच्या आई – वडिलांना बोलविण्यात आले. ग्रामस्थांच्या समोर आईनेही आपल्या त्या कार्ट्याची धुलाई केली. या दरम्यान पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र सदरचा युवक सतरा वर्षाचा असल्याने जबाब नोंदवून समज देऊन सोडून देण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेमुळे सावंतवाडी शहर आणि परिसरातील पालकांनी सजग राहावे, असे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार  सिताराम नाईक यांनी कळविले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles