सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार नागपूर राजभवन येथे करण्यात आला. यावेळी भाजपा नेते नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच मळगांव भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सभापती राजू परब, हनुमंत पेडणेकर, गुरुनाथ गावकर, दीपक जोशी,निलेश राऊळ, प्रकाश जाधव, समीर मांजरेकर, नंदकिशोर केरकर, बाळ्या अरविंदेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


