Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

कपिल देवला संपूर्ण करिअर लागलं, तेच बुमराहने फक्त 6 वर्षांत करून दाखवलं .! ; एकाचवेळी केले २ मोठे रेकॉर्ड ब्रेक.

ब्रिसबेन : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच शानदार प्रदर्शन सुरु आहे. पर्थ आणि एडिलेडनंतर जसप्रीत बुमराहने गाबा टेस्टमध्ये आपला जलवा दाखवला. गाबा टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना कपिल देवचा एक मोठा रेकॉर्ड मोडला. आता बुमराहसमोर मुरलीधरन आणि वसीम अक्रम यांचे रेकॉर्ड आहेत.गाबा कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांचा मोठा रेकॉर्ड मोडला. जसप्रीत बुमराह आता दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशात सर्वाधिक वेळा पाच विकेटचा हॉल पूर्ण करणारा भारतीय बॉलर बनला आहे. त्याने आठवेळा हा कारनामा केलाय. कपिल देव यांनी वर उल्लेख केलेल्या सर्व सेना देशात 7 वेळा, झहीर खान आणि बीएस चंद्रशेखर यांनी 6-6 वेळा एका इनिंगमध्ये 5 विकेट घेतले आहेत. महत्त्वाच म्हणजे बुमराहने फक्त 6 वर्षाच्या टेस्ट करिअरमध्ये हा रेकॉर्ड केला आहे. त्याने 2018 साली टेस्ट डेब्यु केला होता.

आता बुमराहच्या रडारवर कोणाचा रेकॉर्ड?

बुमराह सेना देशात सर्वात जास्तवेळा पाच विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. एशियन बॉलरच्या लिस्टमध्ये तो तिसऱ्या नंबरवर आहे. सेना देशात सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीन अक्रम (11) आणि श्रीलंकेचा दिग्गज स्पिनर मुरलीधरन (10) दुसऱ्या स्थानावर आहे. बुमराहची नजर आता अक्रम आणि मुरलीधरनचा विक्रम मोडण्यावर आहे. सध्या बुमराह इमरान खानसोबत (8) संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियात सर्वात वेगवान 50 विकेट्सचा रेकॉर्ड केलाय नावावर-

बुमराहने गाबा टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचे 6 विकेट काढले. त्याने ऑस्ट्रेलियात आपले 50 टेस्ट विकेट पूर्ण केले. बुमराहने हा कारनामा फक्त 10 सामन्यात केलाय. कपिल देव यांनी 11 कसोटी सामन्यात 51 विकेट घेतलेत. या बाबतीत जसप्रीत बुमराहने कपिल देव यांना मागे टाकलं. बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वात वेगवान 50 विकेट घेणारा भारतीय बॉलर बनलाय.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles