Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तिमत्व विकासाला चालना! : सज्जनकाका रावराणे.

वैभववाडी : राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिरातून अनेक गोष्टी शिकता येतात. अशा शिबिरातूनच व्यक्तिमत्व विकास घडून येतो असे प्रतिपादन श्री.सज्जन काका रावराणे यांनी केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने सांगुळवाडी प्राथमिक शाळा येथे आयोजित केलेल्या निवासी श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन समारंभ स्थानिक समिती अध्यक्ष श्री.सज्जन काका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार, सांगुळवाडी गावच्या सरपंच श्रीमती पुजा रावराणे, उपसरपंच श्री. बाळाजी रावराणे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहलता राणे, ग्रामसेवक श्री. विद्याधर सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती स्नेहल भोवड, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय रावराणे, प्रा. एस. एन. पाटील, डॉ. एस. सी. राडे, प्रा. के. एम. सुतार उपस्थित होते. सदर शिबीर १६ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२४;या कालावधीत संपन्न होणार आहे.

सदर शिबीर ‘विकसित भारतासाठी तरुणांचे योगदान’ या प्रमुख संकल्पनेवर आधारीत आहे. या शिबिरामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्यक्तिमत्त्व विकास, सायबर सुरक्षा, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, रक्तक्षय तपासणी, मतदार जनजागृती, इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्हीं. गवळी यांनी या सात दिवसीय शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होऊन स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ.एम. आय कुंभार यांनी या शिबिराला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. चौगुले, सूत्रसंचालन प्रा. एस. एस. पाटील व आभार प्रा. आर. ए. भोसले यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles