दोडामार्ग : तालुक्यातील साटेली – भेडशी भोमवाडी येथील कालव्यात कारला मोठा अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे कार थेट कालव्यात कोसळली. दरम्यान, कार मधील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या अपघातानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी साटेली- भेडशी भोमवाडी लगतच्या गावातील असून या गाडीत दोघेजण होते. अपघातानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी कुडासेच्या दिशेने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या कालवा कॉजवेला धडकली व थेट कालव्यात गेली. यावेळी गाडीत असणाऱ्या महिलेला गंभीरपणे दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला तर चालक किरकोळ जखमी झाला आहे.
Accident – कारचालकाचा ताबा सुटला, गाडी गेली कालव्यात! ; महिलेचा दुर्दैवी मृत्यू.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


