Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

धुळे जिल्हा ग्राहक पंचायत मार्फत राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कायदेविषयक कार्यशाळा संपन्न.!

धुळे : धुळे शहर व ग्रामीण ग्राहक पंचायत महाराष्ट्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजकार्य महाविद्यालय मोराणे,दामिनी महिला अन्याय अत्याचार निवारण केंद्र,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८/१२/२०२४ रोजी जिल्हा परिषद स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात कायदे विषयक कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी डॉ.प्रा.सुवर्णा बर्डे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन एस. एम. पाटील ,जगदीश बोरसे,ॲड.चंद्रकांत येशीराव उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात एस.एम.पाटील यांनी ग्राहक कायद्याबाबत माहिती दिली व लोकांमध्ये ग्राहक कायद्याबद्दल जनजागृती कशा प्रकारे करता येईल, या बद्दल उपाययोजना सुचविल्या.ग्राहक पंचायात महाराष्ट्र यांच्या कामकाजा बद्दल माहिती दिली.
जगदिश बोरसे यांनी ग्राहक हा राजा आहे. ग्राहकांनी त्यांना मिळालेले अधिकार माहिती असायला पाहिजे, या बद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना संबोधित केले. ग्राहक पंचायत कामकाजबद्दल माहिती दिली.
ॲड.चंद्रकांत येशीराव यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ बद्दल सखोल माहिती दिली. दिशाभूल करणाऱ्या जाहिरांतीबद्दल कुठे तक्रार करावी याची माहिती दिली, वस्तू खरेदी केली की बीलाचे महत्त्व समजून सांगितले,ग्राहक आयोगात तक्रार कशी दाखल करावी,ग्राहक आयोगात कोणत्या कोणत्या तक्रारी दाखल करता येतात, या बद्दल सखोल महिती दिली.त्या नंतर ॲड.येशीराव यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध,मनाई आणि निवारण)कायदा,२०१३ या कायद्या बद्दल सखोल मार्गदर्शन केले.या मध्ये भवरी देवी प्रकरण,विशाखा जजमेन्ट,तक्रार निवारण समिती बाबत उदाहरणासह सखोल माहिती दिली.
डॉ. सुवर्णा बर्डे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, ग्राहकांनी जागृत होणे गरजेचे आहे ग्राहकांनी अन्यायाविरोधात ग्राहक आयोगात दाद मागावी,२४ डिसेंबर हा राष्ट्रिय ग्राहक दिन आहे या निमित्ताने ग्राहक कायद्या बद्दल जनजागृती आवश्यक आहे आणि ते आजच्या तरुणाईचे आहे. महिलांनी तक्रार निवारण समितीकडे अन्यायाविरुद्ध दाद मागावी.
कार्यक्रमाची सुरुवात सानेगुरूजींच्या प्रार्थनेने करण्यात आली तर शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.या कार्यक्रमासाठी डॉ.प्रा.एस.डी. वळवी सर यांचे विशेष योगदान लाभले, सदर उपक्रम हा २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त ॲड.जे.टी.देसले ग्राहक पंचायत धुळे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशश्विते साठी ग्राहक पंचायत चे श्री.ईश्वर बारी,राकेश गाळणकर,श्री.भास्कर पाटील, श्री.विनोद रोकडे,श्री.दीपक पाटील,दर्शना गीते,स्वप्नाली ठाकरे,गीता पावरा,ज्योती अहिरे,शारोन कुरेशी, गणेश धूम यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles