Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

OpenAI चा धमाका, आता WhatsApp वर पण चालणार! ; वापरणार कसं?, मग ‘हे’ वाचाचं!

पुणे : OpenAI ने चॅटबॉट ChatGPT चा विस्तार केला आहे. आतापर्यंत चॅटबॉटचा वापर करण्यासाठी ॲप डाऊनलोड करावा लागत होता. अथवा युझर्सला वेब व्हर्जनचा वापर वाढवावा लागत होता. आता तुम्ही चॅटबोट थेट व्हॉट्सॲपवर वा कॉलवर ॲक्सेस करू शकता. कॉलवर चॅटजीपीटीचा ॲक्सेस सर्वच युझर्सला मिळणार नाही. व्हॉट्सॲपवर चॅटबॉट उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला एक नंबर डायल करावा लागणार आहे. वा क्रमांकावर व्हॉट्सॲप करावे लागेल. तुम्हाला चॅटबॉट वापरता येईल. अमेरिकेतील युझर्सला चॅटजीपीटीचा फ्री ॲक्सेस कॉलवर मिळेल, पण ही सुविधा केवळ 15 मिनिटांसाठी असेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कोणाला मिळणार व्हॉट्सॲपवर ChatGPT

व्हॉट्सॲपवर ChatGPT त्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असेल, जिथे चॅटजीपीटीची सेवा पूर्वीपासून सुरू आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे, ही सेवा सुरू करण्यासाठी अमेरिकेतील वापरकर्त्यांना चॅटजीपीटीला प्रत्येक महिने 15 मिनिटांचा व्हॉईस कॉल ॲक्सेस मिळेल. ही सेवा मोफत असेल. भविष्यात त्यात बदल होण्याची शक्यता आहे. कंपनी या नवीन पद्धतीने लोकांपर्यंत चॅटजीपीटी अगदी सोप्या पद्धतीने पोहचवू इच्छित आहे.

खासकरून त्या लोकांपर्यंत चॅटजीपीटी पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, ज्याच्यापर्यंत आतापर्यंत AI पोहचले नाही. The Verge च्या नियमानुसार, OpenAI च्या चीफ प्रोडक्ट ऑफिसर Kevin Well ने सांगीतले की, हे फीचर काही आठवड्यात विकसीत केले आहे.

मोबाईलवर चॅटजीपीटीच्या ॲक्सेससाठी ओपनएआयने रिअल टाईम API चा वापर केला आहे. तर WhatsApp वर GPT 4o Mini चा वापर केला आहे. ते एपीआय सोबत जोडण्यात आले आहे. जे युझर्स प्रगत फीचर, जास्त वापर करू इच्छितात, त्यांना नेहमीचे ChatGPT खाते वापरणे फायद्याचे ठरेल.

WhatsApp वर कसे वापरणार ChatGPT?

अमेरिकेतील वापरकर्ते 1-800-242-8478 वर कॉल करून चॅटबॉटचा वापर करू शकता. येथील युझर्स हे लँडलाईनच्या माध्यमातून चॅटबॉटचा वापर करू शकता. तर व्हॉट्सॲपवर वापर करण्यासाठी याच संबंधित क्रमांकाचा वापर करता येईल. या क्रमांकावर मॅसेज करून युझर्सला ChatGPT वापरता येईल.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles