सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, आरोंदा या शैक्षणिक संस्थेच्या वतीने आरोंदा हायस्कूल आरोंदाच्या भव्य पटांगणावर “माजी विद्यार्थी महामेळावा 2024” च्या शानदार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोंदा गावचे सुपुत्र व मुंबई येथील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ डॉ. बळवंत केरकर उपस्थित होते तर स्वागताध्यक्ष म्हणून आरोंदा गावचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल पद्माकर नाईक उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. वाय. नाईक हेही या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे माजी प्राचार्य प्रा.अरुण पणदूरकर उपस्थित होते.
आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री संदेश परब, उपाध्यक्ष बबन नाईक, संस्थेचे सचिव भाई देऊलकर, खजिनदार रुपेश धर्णे, सहसचिव अशोक धर्णे कार्यकारणी सदस्य प्रशांत कोरगावकर, स्नेहा हरी गडेकर, आत्माराम आचरेकर, नारायण आरोंदेकर, माजी विद्यार्थी अनिल दाभोलकर, शंकर जाधव, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक अरुण धर्णे तसेच प्रशालेचे विद्यमान प्राचार्य सिद्धार्थ तांबे तसेच संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष लेफ्टनंट कर्नल पद्माकर नाई क यांनी ‘ आरोंदा हायस्कूलच्या स्थापना व कारकीर्दीचा इतिहास थोडक्यात सांगितला व गावाशी असलेल्या नात्याची जाणीव ठेवून माजी विद्यार्थ्यांनी सातत्याने आपले नैतिक कर्तव्य पार पाडले पाहिजे ‘याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी प्रशालेचे पहिले इयत्ता पाचवी चे माजी विद्यार्थी व मुंबई येथील प्रतिथयश डॉक्टर बळवंत केरकर यांनी आपली वैद्यकीय कारकीर्द व शैक्षणिक कारकीर्द किंवा आरोंदा हायस्कूल या शाळेमुळे घडू शकली याबद्दल तत्कालीन शिक्षकांचे ऋण व्यक्त केले व विद्यमान कालखंडातील शिक्षकांनीही अशाच प्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध अंगी कला गुण आणि शैक्षणिक विकासासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य अरुण पणदुरकर यांनी भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग व व्यक्तीमधील कर्तव्य तत्परता याविषयी माहिती देऊन मराठी माध्यमाच्या शाळा जगण्यासाठी गावातील मध्यमवर्गीय व सर्व घटकांनी सहकार्य करून आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देऊन सक्षम बनवणे गरजेचे आहे तर जगाच्या बाजारात त्यांना सक्षमपणे आपल्या विविध क्षेत्रांमध्ये गेल्या विहार करता येईल असे प्रतिपादन केले प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे यांनी माझे शिक्षक हे या प्रशालेतील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा व कला विविध उपक्रम यांत सहभाग देत असून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
शेवटी संस्थेचे अध्यक्ष संदेश परब यांनी संस्थेचे भविष्यकाळातील संकल्प या विषयी माहिती दिली. केजी ते प्राथमिक चौथी सेमी इंग्रजी माध्यमातून सुरू करण्याबाबत संस्था विचार करत असून भविष्यकाळात व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शाळेत काही करता येईल का? याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून पुढील काळामध्ये संस्थेच्या वाटचालीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व एस पी के कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका नीलम धुरी नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांनी केले प्रथम सत्रातील या कार्यक्रमानंतर दुपार सत्रामध्ये भोजन अवकाश यानंतर माजी विद्यार्थी सुसंवाद व चर्चा असा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील नव्या संकल्प बाबत आपल्या सूचना व प्रस्ताव मांडले व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची नोंद करून घेतली व भविष्यकाळामध्ये सर्वांच्या विधायक सूचनांचा विचार करून आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ हे शिक्षण विस्तार करेल याबाबत उपस्थितांना आश्वासित करण्यात आले. सायंकाळी ठिक ७:३० वाजता ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांच्या मनोरंजनासाठी ” विन्ध्यवासिनी विंदेश्वरी “हे शरद मोचेमाडकर दिग्दर्शित दशावतारी नाट्य प्रयोग सादर करण्यात आला.


