Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

Big News – रवींद्र वायकरांच्या खासदारकीवर हायकोर्टाचा शिक्का! ; ठाकरेंचे पराभूत उमेदवार अमोल किर्तीकरांच्या याचिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय.

मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाबाबत दिलेल्या निकालाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याची उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी  विजय झाला होता. तर अमोल कीर्तीकर यांना पराभव स्वीकाराला लागला होता. मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची तक्रार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उमेदवार रवींद्र वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे अमोल किर्तीकर यांनी मतमोजणीत घोळ असल्याचा आरोप करत रवींद्र वायकर यांना अपात्र करावे अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने  सुनावणी पूर्ण केली होती. याचा निर्णय राखून ठेवला होता. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अखेर आज न्यायालयानं अमोल किर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली आहे.

कीर्तिकरचे आरोप कोणते? 

निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रियेत अनेक त्रुटी ठेवल्या. फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला. मनाई असलेल्या क्षेत्रात वायकरांच्या निकटवर्तीयांना मोबाइल नेण्यासाठी परवानगी दिली, असंही त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. आपल्या एजंटला निवडणूक अधिकाऱ्याच्या टेबलाजवळ बसू दिलं नाही. कमी मतांच्या फरकाने निवडणूक हरल्यानंतर उमेदवाराला फेरमतमोजणीचा अधिकार असतानाही तो नाकारला गेला असे आरोप केलेले आहेत.त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक हरवण्यासाठी प्रयत्न केले. निवडणूक अधिकाऱ्यांनी अनेक त्रुटी ठेवल्या असंही किर्तीकरांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकरहे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. याआधी अमोल कीर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली होती. लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागला होता.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles