नवी मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा आणि निर्णायक टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात स्मृती मंधानाचा झंझावात पाहायला मिळाला. कर्णधार स्मृतीने 47 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 77 धावा केल्या. स्मृती मंधानाने टी20 कारकिर्दीतलं 30वं अर्धशतक झळकावलं. तसेच न्यूझीलंडच्या सुझी बेट्स हीचा विक्रम मोडीत काढला. 142 डावात स्मृतीने 30 अर्धशतकं झळकावली. तर सुझीला 168 डाव 29 शतकं झळकवण्यासाठी लागले होते. स्मृती मंधानाने अर्धशतकी खेळीत 13 चौकार मारून आणखी एक विक्रम रचला आहे. टी20 क्रिकेटमध्ये स्मृतीने चौकार मारत 500 चौकारांचा टप्पा गाठला आहे. दुसरीकडे, स्मृती मंधाना सलग तीन अर्धशतकं झळकावणारी मिताली राजनंतरची दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.



