नवी दिल्ली : देशात बहुचर्चित ठरलेल्या अग्निवीर भरतीचे अधिसूचना (नोटिफिकेशन) निघाली आहे. भारतीय हवाई दलासाठी अग्निवीर भरतीची प्रक्रिया 7 जानेवरी 2025 पासून सुरु होणार आहे. 27 जानेवरी 2025 पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या भरतासाठी agnipathvayu.cdac.in या वेबसाईटवरुन अर्ज करता येणार आहे. भारतीसाठी पात्रता, शिक्षण आणि शारिरीक क्षमता काय आहे, त्याची माहिती जाणून घेऊ या.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवरी 2005 ते 1 जुलै 2008 दरम्यान झालेला असावा. निवड प्रक्रियेत सर्व चाचण्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी 21 वर्षापेक्षा जास्त असू नये.
उंची अशी हवी –
- पुरुष : 152 सेमी
- महिला : 152 सेमी
- उत्तराखंडमधील महिला उमेदवार : 147 सेमी
- लक्षद्वीप : 150 सेमी
- वय मर्यादा –
- 17.5 ते 21 वर्ष
- जन्मतारीख 1 जानेवारी 2005 ते 1 जानेवारी 2008 दरम्यान हवी.
- वयात सुट इंडियन एअरफोर्समधील अग्निवीर वायु इंटेक 1/2026 मधील नियमानुसार दिली जाईल.
- शुल्क –
- जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस : 550 रुपये
- एससी/एसटी/पीएच : 100 रुपये
- असा असणार पगार –
- पहिल्या वर्षी : 30,000
- दुसऱ्या वर्षी : 33,000
- तिसऱ्या वर्षी : 36,500
- चौथ्या वर्षी : 40, 000
- असा करा अर्ज
- ऑफिशियल वेबसाइट agnipathvayu.cdac.in वरुन अर्ज करावा.
- न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा
- नाम, पासवर्डने लॉग इन करा.
- फॉर्ममध्ये पासपोर्ट साइज फोटो, सिग्नेचर आणि अन्य डॉक्यूमेंट्स अटॅच करा
- शुल्क भरल्यानंतर फार्म सबमिट करा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकींगने शुल्क भरा.
- अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
- कोण करु शकतो अर्ज.? –
विज्ञान शाखेसाठी उमेदवार 50% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्रासह 12 वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने इंग्रजीत 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच 50% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा करणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. विज्ञान शाखेशिवाय दुसऱ्या कोणत्याही शाखेतून 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहावी.



