Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

“विरोधाला विरोध नसेल फक्त ‘विकास’ हाच ध्यास असेल.!’, माऊली युवा प्रतिष्ठान, रेडी संस्थेचा शानदार शुभारंभ! ; माऊली प्रतिष्ठानच्या महाआरोग्य शिबिराचा अनेकांनी घेतला लाभ., ‘माऊली’च्या शिबिराला दिग्गजांची उपस्थिती.!

वेंगुर्ला : श्री माऊली युवा प्रतिष्ठान, रेडी ह्या सामाजिक क्षेत्रातील रेडी गावातील युवकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या संस्थेचा शानदार शुभारंभ रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या शुभारंभाचे औचित्य साधून श्री माऊली युवा प्रतिष्ठान रेडी व एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे सिंधुदुर्ग व हिंद लॅब, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रेडी येथे मोफत महाआरोग्य तपासणी तसेच रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती अजित राऊळ, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, माजी सरपंच अनंत कांबळे, माजी सरपंच सुरेखा कांबळी, माजी सरपंच नंदकुमार रेडकर, माजी सभापती सायली पोखरणकर, वंदना कांबळे, तसेच उद्योजक पराग शिरोडकर, विश्वास नरसुले, प्रकाश पडवळ तसेच रेडकर रिसर्च सेंटरचे डॉ. आकाश जाधव, एसएसपीएम हॉस्पिटलचे डॉ. श्री. सांबरे आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष निलेश रेडकर, सचिव चक्रपाणी गवंडी, मार्गदर्शक राजन कांबळी, खजिनदार वैभव अशोक असोलकर तसेच सदस्य विष्णू आडेलकर यांसह माऊली युवा प्रतिष्ठान रेडी यांच्या सर्व शिलेदारांनी केले.

या शिबिराचा लाभ रेडी दशक्रोशीतील गरजूंनी घेतला. प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिरामुळे अनेकांना फायदा झाला. त्यामुळे प्रतिष्ठानचे अनेकांनी आभार मानले.

या शिबिरामध्ये नेत्र तपासणी तसेच कंबरदुखी, गुडघेदुखी, मणकेदुखी, मूळव्याध मुतखडा, भरणीया, अस्थमा तसेच स्त्रियांच्या संदर्भातील आजार ,हृदयाचे आजार या सर्व आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच ज्या रुग्णांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये यावयाचे असेल,तर आयुष्यमान भारत या सरकारच्या योजनेअंतर्गत ऑपरेशन्स व उपचार केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे रक्त तपासणी शिबिरामध्ये CBC Piped Profile HB, कावीळ तपासणी,थायरॉईड,KFT, महिला व पुरुष कर्करोग तपासणी इत्यादी महत्वपूर्ण रक्तांच्या तपासणी मोफत स्वरूपात करण्यात आल्या. यापुढेही असेच विविध शिबिरे आयोजित करून रुग्णांना सहकार्य केले जाईल असे श्री माऊली युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. निलेश रेडकर व सर्व पदाधिकार्‍यांच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles