Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या ६ गडी बाद ३११ धावा.

मेलबर्न : बॉर्डर – गावस्कर कसोटी मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने फलंदाजीचा निर्णय घेतला. कोनस्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या दिवशी 86 षटकांचा खेळ झाला त्यानंतर दिवस संपला. 86 षटकांचा सामना करत ऑस्ट्रेलियने 6 गडी गमवून 311 धावा केल्या. स्टीव्हन स्मिथ नाबाद 68 आणि पॅट कमिन्स नाबाद 8 धावांवर खेळत आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर आकाश दीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या दिवशी उर्वरित चार गडी झटपट बाद करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. आता भारतीय संघ पहिल्या सत्रात कशी कामगिरी करतो याकडे क्रीडाप्रेमी लक्ष ठेवून आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून 19 वर्षीय सॅम कोनस्टासने पदार्पणाच्या सामन्यातच आपली छाप सोडली. पहिल्या सामन्यात त्याने 65 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने दोन्ही षटकार हे जसप्रीत बुमराहला मारले. त्यानंतर उस्मान ख्वाजानेही अर्धशतकी खेळी पूर्ण केली. त्याने 121 चेंडूंचा सामना 57 धावा केल्या. तर मार्नस लाबुशेन यानेही भारतीय गोलंदाजांना झुंजवल. 145 चेंडूंचा सामना करत 72 धावांची खेळी केली. या सामन्यात ट्रेव्हिस हेड डोकेदुखी ठरेल असं वाटत होतं. पण जसप्रीत बुमराहने त्याची विकेट काढली. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. मिचेल मार्श 4, एलेक्स कॅरे 31 धावा करून बाद झाले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles