किरीटीमाटी बेट : वर्ष 2025 जगभरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. टाईमझोननुसार, किरीटीमाटी बेट (क्रिसमस बेट) न्युझीलंड देशाने सर्वात आधी नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केला. तर भारतापूर्वी 41 देशात नवीन वर्षाचे स्वागत होते.


जगभरात नवीन वर्षाची सुरुवात ही जोरदार आतिषबाजीने करण्यात येते. सिडनी (ऑस्ट्रेलिया) मधील सिडनी हार्बर ब्रिज आणि ऑपेरा हाऊसमध्ये जबरदस्त आतिषबाजी करण्यात आली. हा सोहळा लाखो लोकांनी याची देहि, याची डोळा पाहिला.

दुबई, UAE मधील बुर्ज खलिफा टॉवरवर आतिषबाजी दिसून आली. या टॉवरवर लाईटिंग सजवण्यात आली. न्यूयॉर्क (USA) च्या टाइम्स स्केअरवर फायरवर्क्स, आतिषबाजी डोळ्याचे पारणे फेडते.



