Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

नववर्ष स्वागताचा जल्लोष सुरु असताना ट्रक गर्दीत घुसवला.! ; चालकाचा गोळीबार, १२ ठार.

न्यू ऑरिलीन्स : जगभरात नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत होत असताना बुधवारी अमेरिकेतील न्यू ऑरिलीन्स येथे मोठा अपघात घडला आहे. एक ट्रक भरगर्दीत घुसला आणि अनेक लोक चिरडले गेले. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अमेरिकेत न्यू ऑरिलीन्स शहर फेमस बॉर्बन परिसरात ही घटना घडली. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत की हा नेमका हल्ला मनोरुग्णाने केला आहे की या मागे घातपात आहे याची चर्चा सुरु आहे.

ट्रक ड्रायव्हर करत होता फायरिंग –

स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या समाचार एजन्सी एसोसिएटेड प्रेसच्या बातमीनुसार काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले की ट्रक गर्दीत घुसला आणि ड्रायव्हरने बाहेर येऊन फायरींग केली. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल फायरिंग केली. या हल्लेखोर ठार झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर पाच स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या हल्ल्याची माहिती दिली गेली आहे असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

हा हल्ला बुधवारी सकाळी 3:15 वाजता बॉर्बन स्ट्रीटवर झाला. नव वर्षांच्या पूर्वसंध्येला होणारी ही पार्टी सर्वात मोठी समजली जाते. पोलिसांनी सांगितले की आरोपी हा अधिक लोकांना जखमी करण्याच्या इराद्याने हालचाली करीत होता. त्याने अधिकाधिक लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला.

महापौर म्हणाले अतिरेकी हल्लाच..

न्यू ऑरलियन्सचे महापौर लाटोया कॅट्रेल यांनी या घटनेला अतिरेकी हल्ला म्हटले आहे. एफबीआय या प्रकरणाचा चौकशी करीत आहे. बुधवारी पहाटे झालेल्या हल्ल्याने अमेरिका हादरली आहे. न्यू ऑरलियन्स पोलिसांनी विभागाच्या प्रवक्त्याने सीबीएस न्यूजला सांगितले की सुरुवातीच्या बातमीनुसार एका ट्रकने लोकांच्या एका ग्रुपला ठोकरले. त्यात अनेकांचा मृत्यू  झाला. बीबीसीच्या बातमीनूसार सोशल मीडियातील शेअर झालेल्या व्हिडीओ लोक जमीनीवर जखमी अवस्थेत पडलेले दिसत आहेत.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles