Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर प्रशालेचे पारितोषिक वितरण उत्साही वातावरणात संपन्न!

दोडामार्ग : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज ऑफ सायन्स, कुडासे या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

संगीत विभागाने अतिशय सुंदर असे ईशस्तवन व स्वागत गीत सादर केलेनंतर प्रशालेचे मुख्याध्यापक जे.बी.शेंडगे सर यांनी वर्षभरातील कला,क्रीडा ,व सांस्कृतिक यशाचा आढावा घेतला.यावेळी वर्षभरात विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यामध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या आदर्श ,गुणवंत विद्यार्थ्यांचा,शिक्षकांचा सत्कार प्रमुख मान्यवरांचा हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष नाईक (माजी मुख्याध्यापक, मातोश्री सरलाबाई म्हात्रे विद्यालय, डोंबिवली ) मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी, शैक्षणिक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास होण्यासाठी असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत विद्यार्थ्यांनी आयुष्यात यश मिळवण्यासाठी नेहमी झोकून देवून काम केले पाहिजे नेहमी मोठी स्वप्ने बघा हास्य आणि टाळ्या मानवी मनाच्या भावना आहेत शालेय जीवनातील ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर टिकते.

यावेळी बोलताना डाॅ.उत्तम सावंत म्हणाले विद्यार्थ्यांनी शालेय वयात मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे. विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतला पाहिजे. ज्या व्यक्ती यशस्वी झालेल्या आहेत त्यांची चरित्रे अभ्यासा. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे समाजाचे शाळेचे ऋण कधीही विसरू नये आळस झटकून कामाला लागा आई-वडिलांना आपला अभिमान वाटेल असे काम करा असे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनुजा सावंत मॅडम म्हणाल्या,कुडासे हायस्कूलचे कार्य कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे.
विद्यार्थ्यांनी आज्ञाधारक असले पाहिजे.आई-वडील आणि गुरुजन यांचा सल्लाच तुमचे जीवन समृद्ध करेल . पालक जे सांगतात ते लक्षपूर्वक आचरणात आणा असे सांगितले.

बक्षीसपात्र मुलांचे यादी वाचन एस.व्ही.देसाई यांनी,प्रशालेचा वार्षिक अहवाल वाचन पी.बी.किल्लेदार सर ,क्रीडाअहवाल सोमनाथ गोंधळी तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सागर डेगवेकर व श्रीमती दिपाली पालव मॅडम व आभार एल.के.डांगी यांनी मानले..यावेळी शालेय समिती सदस्य,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष,माध्यमिक व उच्च-माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles