सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे युवा कार्यकर्ते साईनाथ तानवडे यांची निरवडे गावाच्या बुथ क्रमांक 170 च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या हस्ते साईनाथ तानवडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच त्यांचे अभिनंदनही यावेळी करण्यात आले. यावेळी सावंतवाडी महिला विधानसभा अध्यक्षा नीतिशा नाईक, साईनाथ तानावडे, नामदेव तानावडे, हेमंत तानावडे, अमेय तानावडे, अभिजीत तानावडे, सिद्धेश तानावडे, नरेंद्र बोंद्रे यांसह विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ध्येय धोरणे समजून घेत जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढाकार घेणे तसेच संघटना मजबूत करणे यांसह विविध जबाबदारी पार पाडण्यासाठी साईनाथ तानावडे हे भरीव योगदान देतील, असा आशावाद यावेळी अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला.